दापोली : पुढारी वृत्तसेवा : पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडण्याच्या शक्यतेने कोकणातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, दि. २४ एप्रिल, २०२२ रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी. दि.२५ एप्रिल,२०२२ रोजी रायगड आणि रत्नागिरी जिल्हयातील तुरळक ठिकाणी. दि. २६ एप्रिल, २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हयातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सतत होणारे हवामानातील फेरबदल आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा आणि काजू बागायतदार पुरता बुडाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. दरवर्षी लाखोंचा हापूस आंबा विक्री करणारा शेतकरी आर्थिक संकटात आहे. अनेक शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित हे आंबा आणि काजू उत्पन्नावर अवलंबून असते. आंबा नुकसानीमुळे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानीत गेले आहे. अनेक व्यावसायिक बागायतदार यांनी अन्य शेतकऱ्यांच्या बागा या हंगामी फळांसाठी ठराविक रकमेवर घेतल्या आहेत. मात्र, या बागा पार करपून गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक संकट वाढले आहे. अवकाळी पाऊस सतत पडत असल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here