
साडवली : पुढारी वृत्तसेवा
विक्री व तस्करीच्या उद्देशाने खवले मांजर बाळगल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तरुणाची गुरूवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
तालुक्यातील मेघी पवारवाडीतील ललित सतिश सावंत हा तरूण देवळे फाटा ते देवळे गाव जाणार्या मार्गावर देवालय याठिकाणी खवले मांजराला मोटारसायकलवरून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती देवरूख पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ एका सिमेंटच्या रिकाम्या पिशवीत जिवंत खवले मांजर आढळून आले. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा