देवगड/मुणगे : पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी-खेड येथे बोलेरो व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री झाला. शुक्रवारी मध्यरात्री 12.45 च्या सुमारास भोगाव संत तुकाराम मंदिरशेजारी देवगडकडून मुंबई- वाशीच्या दिशेने जाणारी बोलेरो पिकअप व जयगडहून ठाणे-मुंबईकडे जाणारा ट्रक यामध्ये समोरासमोर धडक बसून हा अपघात झाला.

या अपघातात देवगड तालुक्यातील तुषार प्रकाश चव्हाण (27, रा. नारिंग्रे) व नीलेश मनोहर शेट्ये (37, रा. मुणगे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश उत्तम कोयंडे (24, देवगड) याला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नारिंग्रे येथील तुषार चव्हाण हा अविवाहित आहे. तर मुणगे येथील नीलेश शेट्ये हा विवाहित असून त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, आई, भाऊ, बहीण, भावजय असा परिवार आहे. तुषार व नीलेश याच्या अपघाताची बातमी सकाळी गावात समजताच नारिंग्रे व मुणगे गावावर शोककळा पसरली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले.बोलेरो पीकअप देवगड येथून आंबे घेवून मुंबई वाशी येथे जात होती.

हेही वाचलत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here