
पाली (रायगड); पुढारी वृत्तसेवा : सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेतील स्वागत हॉटेल शेजारी असलेल्या मेणबत्ती व सुगंधी द्रव्य निर्मिती कारखान्याला मंगळवारी भीषण आग लागली. या भयानक आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारी साडेतीनच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. स्थानिक नागरिक, तरुण व अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली.
भर बाजारपेठेत असलेल्या मेणबत्ती कंपनीला अचानक आग लागल्याने पाली शहरातील शेकडो नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मेणबत्ती कंपनीत केमिकल युक्त पदार्थ असल्याने अखेर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचून अग्निशमन दलाने पाणी व फोमच्या साहाय्याने ती आग शमवली.
ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समजू शकले नाही. मात्र आगीमुळे कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला. या आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाली शहरातील तमाम नागरिकांनी वेळेवर आग विझवण्यासाठी धावून आल्याने सुदैवाने आजुबाजूची अनेक घरे या आगीच्या तांडवात पासून बचावली गेली.
पाली शहराच्या नगराध्यक्षा गीता पालरेचा, जि.प.सदस्य सुरेश खैरे, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, राजेश मपारा, तहसीलदार दिलीप रायन्नावर, पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, शहरातील अन्य नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी पोहचत पाहणी केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात ? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदा होऊन जाऊ दे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. pic.twitter.com/sLNzDx8Qd1
— Pudhari (@pudharionline) May 3, 2022