खेड (रत्नागिरी); पुढारी वृत्तसेवा : येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अक्षय तृतीया निमित्त मंगळवारी आयोजित करण्यात आलेली महाआरती बुधवारी (दि. ४) सायंकाळी ७ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर येथे करण्यात आली. यावेळी हनुमान चालीसा पठण करून आरतीला सुरवात झाली. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्त्री-पुरुष मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेतर्फे नियोजित महाआरती स्थगित करण्यात आली होती. यानंतर बुधवारी शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर सायंकाळी ७ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मनसेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने यावेळी नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. महाआरतीला उपस्थित कार्यकर्त्यांनी सुरवातीला ढोल ताशांच्या गजर केला. त्यानंतर हनुमान चालीसा व महाआरती करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकीरण काशीद यांच्या नेतृत्वाखाली यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात चारही बाजूला शेकडो पोलीस, राखीव पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवान यांचा बंदोबस्त तैनात करत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here