
दापोली (रत्नागिरी), पुढारी वृत्तसेवा : दापोली हर्णे बंदरात लाटांच्या तडाख्यामुळे एक नौका बुडाली. यामध्ये बोटीचे तब्बल पाच लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही. ही घटना शनिवारी (दि ७) दुपारी २ च्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे बंदरातून मासेमारी करण्यासाठी चांगा भोईनकर हे नौका घेऊन गुरुवारी (दि. ५) रात्री उशिरा हर्णे बंदरातून मासेमारीसाठी गेले. यावेळी मुलगा नंदकुमार असे दोघेच नौकेवर मासेमारीला गेले होते. दोघेही हरेहरेश्र्वरमध्ये मासेमारी करत होते. त्याचवेळी अचानक नोकेवरील मशीन बंद पडली. त्याचवेळी त्यांनी जवळ असलेल्या पाजपंढरी येथील हेमा चोगले यांच्या नौकेला आवाज मारून जवळ बोलावले व सदरच्या नौकेने दोरी बांधून नौका हर्णेमध्ये घेऊन येत हाेते.
दरम्यान, कनकदुर्ग किल्ल्याजवळ आल्यावर लाटांचे जोरदार तडाखे बसून नौकेची दोरे तुटली आणि नौकेत पाणी शिरून ती जाग्यावरच बुडाली. यात नौकेचे पाच लाखाचे नुकसान झाले आहे. नौकेला जलसमाधी मिळाल्यामुळे सर्व सामान वाहून गेले आहे. तसेच आणलेली मासळी देखील वाहून गेली. या घटनेचा मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी साळवी यांनी पंचनामा केला.
हेही वाचा
सावधान! आकोल्यात ‘मामा-भाचा डोह’ बनला मृत्यूचा सापळा ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
पिंपरी : पार्याची चाळीशी; काहिली असह्य
Musk Twitter Deal : ट्वीटरची खरेदी पडणार लांबणीवर? एलन मस्क विरोधात याचिका दाखल