
दापोली पुढारी वृत्तसेवा : दापोली हर्णे रोडवर वीर सावरकर चौक येथे दोन दुचाकी एकमेकांवर आदळून यात एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.तर एक जण जखमी झाले आहेत.ही घटना दि 8 रोजी रात्री 8: 30 च्या सुमारास घडली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुरलीधर लांबे (जालगाव) हे मोटारसायकल (क्र.एम.एच.08 ए आर.2401) ही दापोली ते हर्णे रोडवर आले असता. मंदार मनोज पवार (रा.रुपनगर दापोली) याने त्याची मोटारसायकल (क्र.एम.एच.46 ए.एस 8933) या गाड़ी ने लांबे यांच्या गाडीला भरधाव वेगाने धडक दिली. यातील मंदार यास गंभीर दुखावत झाली असता त्याला मुंबई येथे उपचरासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, यात मंदारचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मंदार हा भरधाव वेगाने वाहन चालवून विरुध्द दिशेला जावून फिर्यादीचे ताब्यातील मोटरसायकलला ठोकर दिल्यामुळे हा अपघात झाला, तसेच यामध्ये तो स्व:ताच्या दुखापतीस व दोनही वाहनांचे नुकसाणीस कारणीभूत झाला अशी फिर्याद लांबे यांनी नोंदवली आहे.
हेही वाचलंत का ?
- दहावी आणि बारावीचा निकाल जूनमध्येच मात्र अधिकृत घोषणा अद्याप नाही
- Prithviraj Trailer : अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा ट्रेलर रिलीज, मानुषी छिल्लरचा ग्रँड डेब्यू (Video)
- Shehnaaz Kaur Gill : अभिनेत्री शेहनाजने व्यायामाशिवाय तब्बल १२ किलो वजन घटवलं!
The post दापोली : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.