कासार्डे (सिंधुदुर्ग ) : दत्तात्रय मारकड
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. महामार्ग सुसाट बनल्याने महामार्गावरून धावणार्‍या वाहनांचा वेग सरासरी ताशी 100 कि.मी.पेक्षा अधिक वाढला आहे. मात्र, महामार्गावर जागोजागी असलेल्या अनधिकृत मिडलकटमुळे या चौपदरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. असे अनधिकृत मिडलकट वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
महामार्गाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणार्‍या खारेपाटण ते झाराप या केवळ 73 कि.मी. च्या क्षेत्रात तब्बल 50 ठिकाणी अनधिकृत मिडलकट आहेत. तर या टप्प्यात केवळ 18 ठिकाणी अधिकृत मिडलकटआहेत.

कणकवली-जानवली ते तळेरे-वाघाचीवाडी या सुमारे 23 कि.मी. अंतराचे सर्वेक्षण केले असता एकूण तब्बल 29 मिडलकट आढळून आले. त्यापैकी केवळ 5 मिडलकट सोयीनीयुक्‍त अधिकृत आहेत. तर इतर तब्बल 24 मिडलकट अनधिकृत आहेत. हीच संख्या कणकवली ते ओरोस या 23 कि.मी अंतरावर 6 अधिकृत, 8 अनधिकृत, ओरोस ते कुडाळ 15 कि.मी.अंतरात 3 अधिकृत, 12 अनधिकृत, कुडाळ ते झाराप 12 किमी. अंतरात 4 अधिकृत तर 6 अनधिकृत मिडलकट असल्याचे आम्ही केलेल्या सर्वेत आढळून आले आहे. खारेपाटण-टाकेवाडी ते झाराप 73 किमी.वर ही संख्या खूप मोठी होवू शकते. अपघातास कारणीभूत ठरणारे सर्व अनधिकृत मिडलकट बंद करा असे निर्देश यापूर्वीच महामार्ग पोलिस विभागाने हायवेचे ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणला दिले आहेत.

गरजेप्रमाणे तयार झालेले आणि जागोजागी असलेले मिडलकट ओलांडताना सतत अपघात होत असून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कांहीं दिवसांपूर्वी कासार्डे तिठ्यानजीकच्या अनधिकृत मिडलकटमधून मोटरसायकल महामार्गावर आणताना आरामबसने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार व महिला अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. खरेतर महामार्ग प्राधिकरणने हे मिडलकट ठेवलेले नाहीत, तर स्थानिकांनी आपल्या सोयीसाठी म्हणूनते अनधिकृत रित्या तयार केले आहेत. ज्याठिकाणी खरोखरच मिडलकटची गरज आहे त्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने अधिकृत आणि सोयीनयुक्‍त मिडलकट तयार करायला हवेत. अन्यथा अपघाताची ही जीवघेणी मालिका अशीच कायम सुरू राहणार. मग याठिकाणी होणार्‍या मनुष्यहानीला जबाबदार कोण? असा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here