
रायगड; पुढारी वृत्तसेवा : आज सकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अंडा पॉइंट जवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणारा ट्रेलर समोरील टेंपोवर जाऊन आदळला. ट्रेलर चालकाला कंट्रोल न झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली.
या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला. ट्रेलरने टेम्पोला पाठीमागच्या बाजूने धडक दिल्याने टेम्पो उलटला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. या दुर्घटनेची माहीती मिळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर अपघातग्रस्तांच्या मदतीकरिता बचाव कार्यगट आणि इतर यंत्रणांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि सर्व यंत्रणांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू करून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीवर आणखी परिणाम झालेला आहे.
“दोन वेळा पंतप्रधान झालात, पुढे काय?”, मोदींनी उत्तरात शरद पवारांवर साधला निशाणा. https://t.co/anG3JpQCkb@narendramodi @PawarSpeaks
— Pudhari (@pudharionline) May 13, 2022
हेही वाचा