खेड, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील उधळे गावानजीक शुक्रवारी (दि. १३) पहाटे ४.४५ वाजता हा  अपघात झाला. मुंबईकडून लांजाकडे जाणाऱ्या मोटारवरील चालकाचे नियंत्रण सुटून, मोटार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणाऱ्या एका वृद्धाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असून, अन्य प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालक संजय गणपत नामे (वय ४३, रा. मालाड, शांतारामपाडा मुंबई) हे शुक्रवारी (दि. १३) पहाटे मुंबईकडून लांजाकडे जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर मोटार भरधाव वेगाने चालवित असताना चालकाचा मोटारीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याचे कच्चा साईडपट्टीवरील दगडाला आपटून उलटली. अपघातात मोटारीतील गणपत नारायण नामे (वय ७५, रा. मालाड) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच, कशेडी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी समील सुर्वे घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कळंबनी येथे उपचारासाठी दाखल केले. मोटारीतील इतर प्रवासी संजय गणपत नामे (वय-४३ वर्षे), संतोष गणपत नामे (वय-४५), अंजना संतोष नामे (वय-३८), संचित संतोष नामे (वय-८), श्रीवल्ली संदीप नामे (वय-८) हे जखमी झाल आहेत. अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.

हेही वाचलत का ?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here