दापोली; पुढारी वृत्तसेवा : दापोली पोलीस स्थानक इमारतीस आग लाग लागल्‍याची घटना घडली आहे. सकाळी ६ ते ६:३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दापोली पोलीस स्थानक कर्मचारी आणि शहरातील नागरिक यांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान दापोली पोलीस स्थानकाची गाडी वेगाने नगर पंचायतीच्या दिशेने गेली. त्यामुळे काही नागरिकांनी नेमके काय झाले म्हणून पोलीस स्थानक इमारतीकडे पाहिले असता इमारतीने पेट घेल्याचे नागरिकांना दिसले. या नंतर तात्काळ शहरातील अनेक नागरिकानी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यावेळी दापोली नगर पंचयात कर्मचाऱ्यांनी फायरब्रिगेडच्या साह्याने या आगीवर नियंत्रण आणले.

तर या इमारतीमधील महत्वाची कागदपत्रे आणि अन्य सामुग्री पोलिसांनी या आगीतून वाचवली. आग लागल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी तात्काळ भेट देऊन परिस्तिथीचा आढावा घेतला, तर आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्यात येईल असे पोलीस अधीक्षकांनी पत्रकारांना सांगितले. या आगीची माहिती मिळताच दापोली नगर पंचायत नगराध्यक्ष ममता मोरे, भाजपचे केदार साठे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि मदतकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here