खेड (रत्नागिरी) ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडनजीक आज (दि.१९) सकाळी मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्‍या अपघातात चालकासह पाचजण जखमी झाले.

कृष्णा चोवबे (रा.कल्याण) हे मोटार (एमएच०५ईएल ८९८२) घेऊन कल्याणकडून राजापूरला जात होते. महामार्गावरील खेडनजीक त्याचा मोटारीवरील ताबा सुटल. मोटार रस्त्याच्‍या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन धडकली.

या अपघातात चालक कृष्णा चोवबे  यांच्मो‍यासह रुपेश संदीप पांचाळ (वय२६), वनिता संदीप पांचाळ (वय१४), सिद्दीकी रुपेश पांचाळ (वय २२), यश योगेश पांचाळ (वय१९ सर्व रा.कल्याण) हे जखमी झाले. त्यांना कळबणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  कशेडी पोलिस मदत केंद्रातील सहायक पोलिस उपनिरीक्षक समिल सुर्वे व सहकाऱ्यांनी  जखमींना मदत केली.

हेही वाचलंत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here