▪️रत्नागिरी- देवरूख मार्गावरील सुरू असलेल्या कामाबाबत तक्रारी करून ही तिकडे लक्ष न देता ठेकेदार मनमानी काम करत असून अधिकारी लक्ष देत नसल्याने आज तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी शिष्टमंडळासह देवरूख सा. बां. विभागात धडक देवून विषेशता निवे व पाटगाव घाटी मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे.
▪️सार्वजनिक बांधकाम उप अभियंता यांना निवेदन देताना प्रमोद पवार यांच्यासमवेत माजी जिप अध्यक्ष रोहन बने. निवे सरपंच. आंबव उप सरपंच रूपेश माने. वाशी उपसरपंच सुनील सावंत. पुर सरपंच सुबोध पेडणेकर.युवा सेनेचे मुन्ना थरवळ आदी उपस्थित होते.
▪️याबाबत पत्रकारांना माहिती देताना , शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार यांनी पाटगाव घाटीतील कामाबाबत यंत्रणेने कामचुकारपणा करून जनतेला वेठीस धरणे बरोबर नाही..जमिनीचा वाद निर्माण का झाला.. काही ठिकाणी ७/१२ वर जमिनी मालकांची नाव आहेत. त्यांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध आहे. तो वाद १वर्ष सुरू आहे. मग संबंधितांनी यावर वेळीच मार्ग का काढला नाही. आता जनतेची होणारी वाहतुक समस्या त्वरीत सोडवा. तुमचा अधिकारात रस्ता आहे की नाही हे नंतर सिद्ध करा पण पुर्वी जेवढा रस्ता होता ते काम त्वरीत सुरू करा असे ठणकावले त्यावर सदर रस्त्याचे काम दि.२१ वा २२ ला वाद नसलेल्या भागाचे काम सुरू होणार असल्याचे सांबा. विभागानेचे अधिकारी वर्गाने सांगितले. सदरचे काम उद्या सुरू होणार असल्याने प्रवासीवर्गासह चालकांची मोठी गैरसोय दुर होणार आहे. तसेच ठेकेदार. सा. बां. वरिष्ठ अधिकारी. निवे. आंबव. वाशी. पुर या गावातील सरपंच व गुण नियंत्रक कार्यालयातील अधिकारी यांची या तळेकांटे-देवरूख रस्त्याचे कामा विषयीच्या तक्रारींची सोडवणूक करणेसाठी ४दिवसात एकत्र बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती हि पवार यांनी दिली.
▪️आता यावर तहसील यंत्रणा, बांधकाम विभाग कोणती भूमिका घेते याकडेच तमाम नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत