रायगड ; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील खरवली बोरगाव येथे एका महिलेने पोटच्या पोरांना विहीरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहीरीतून चार मुलांचे मृतदेह मिळाल्याने नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान तीने एकून सहा मुलांना विहीरीत फेकले असल्याचे स्थानिकांकडून समजत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत चार मुलांचे मृतदेह हाती लागले आहेत. पोलीस यंत्रणेने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले घटनास्थळी पोहोचले. मात्र या घटनेतील महिलेचे नाव, तिच्या नवऱ्याचे नाव आणि तिने हे कृत्य का केले यासंदर्भात कोणताही खुलासा अजून झालेला नाही. पोलीस अद्याप या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here