गुहागर ; पुढारी वृत्तसेवा : गुहागर तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहिरीत दि. 1 जूनला रात्री बिबट्याचा बछडा पडला होता. वन विभागाने ग्रामस्थांच्या साह्याने पिंजर्‍याद्वारे दीड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी करून या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

गुरुवारी सकाळी विहिरीच्या ढासळलेल्य भागात बछडा बसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती वन विभागापर्यंत पोहोचवली. त्यानंतर गुहागरचे वनपाल संतोष परशेट्ये, खेडचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, दत्ताराम सुर्वे पिंजरा घेऊन घटनास्थळी पोहोचले. तेथील ग्रामस्थांच्या मदतीने या बछड्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या बछड्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी निरीक्षण केले. बछडा जखमी, भुकेलेला नसल्याचे लक्षात आल्यावर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या परवानगीने या बछड्याला वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

यावेळी तवसाळचे सरपंच, पोलीसपाटील यांच्यासह कमलेश कदम, दीपक कदम, नंदू कदम, नीलेश कदम, मसुद्दीक कारभारी, विजय नाखरे, चंद्रकांत निवाते आदी उपस्थित होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here