रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सलग दुसर्‍यांदा शुक्रवारी दुपारी पोलिसांनी रत्नागिरी मच्छीमार्केट परिसरातच अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई करून ८० ग्रॅम चरस जप्त केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी वेशांतर करून ही धाड टाकत सलमान डांगे या हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.

मिळालेल्या माहितीनूसार, रत्नागिरी शहरात अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरवासीयांनी वारंवार तक्रारी देऊन देखील विक्री विरोधात ठोस कारवाई होत नव्हती. सोमवार दिनांक ३० मे रोजी मच्छिमार्केट परिसरातच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली होती. या ठिकाणी  पोलिसांनी एका संशयितांकडून अंमली पदार्थ हस्तगत केले होते. शहरात चरसची विक्री होत असल्याचे या कारवाईतून उघडकीस आले होते.

अमली पदार्थ : वेषांतर करुन गुन्हेगाराला पकडले

शुक्रवारी (दिनांक ३ मे) दुपारच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक राहुल घोरपडे हे डॉक्टरकडे जाण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी मच्छिमार्केट परिसरातील एका इमारतीत चरसची विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून त्या परिसरात कारवाई करण्याचा निर्णय  घेतला. त्याची सूचना त्यांनी प्रभारी शहर पोलीस निरीक्षकांना दिली. कारवाई करण्याचा परवानगी मिळाल्यानंतर घोरपडे यांनी अंड्याचा विक्रेता म्हणून वेशांतर केले. संशयिताला पोलीस असल्याची कल्पना येऊ नये म्हणून त्यांनी एका हातात अंड्याचे ट्रे तर दुसर्‍या हातात भाजीची पिशवी घेतली होती. डोक्यात गोल टोपी घातली होती. त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण झाले होते. ज्या ठिकाणी चरसची विक्री होत होती त्या ठिकाणी घोरपडे यांनी धाड टाकली. सलमान डांगेला जेरबंद केले. त्याच्याकडून ८० ग्रॅम चरस हस्तगत केले आहे.

या कारवाईनंतर घोरपडे यांनी शहर पोलीस ठाण्याच्या डीबी स्क्वॉडला माहिती दिली. या माहितीवरून डीबी स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. संशयिताला या पथकाच्या ताब्यात दिल्यानंतर पुढील कारवाई डीबी पथकाने सुरू केली आहे.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here