
कणकवली : 1 व 2 जून रोजी चांगला पाऊस झाल्याने तसेच 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकर्यांनी भात पेरणी केली आहे. मात्र, गेले चार दिवस पाऊस न झाल्याने ही भात पेरणी धोक्यात आली आहे. पावसाअभावी भात न रूजल्यास दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकर्यांवर येणार आहे. जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने या भागात बहुतांश शेतकर्यांनी भात पेरणीला सुरूवात केली. सुमारे 50 टक्के शेतकर्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. मात्र, पावसाअभावी हे शेतकरी संकटात सापडले आहेत.