रत्नागिरी ः पुढारी वृत्‍तसेवा :  60 कि. मी. वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आल्याने दि. 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आदी भागांत 8 जूनपासून विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वार्‍याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही वातावरणीय स्थिती कोकण किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र, बुधवारपासून किनारी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वार्‍यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मासेमारी बंद ठेवण्याचे निर्देश

भारतीय हवामान खात्याच्याकुलाबा वेधशाळेडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 8 जून 2022 ते 10 जून 2022 या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी 40-50 कि. मी ते 60 कि. मी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मच्छीमारानी संबंधित कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जावू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here