
रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा :
शहरातील क्रांतिनगर येथे सोमवारी दुपारी झालेल्या वादाच्या रागातून रात्री 8 च्या सुमारास तरुणावर तलवारीने सपासप वार करण्यात आले. हल्लेखोर अद्यापही फरार असून, शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
राजेंद्र शिवाजी विटकर (28, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) असे वार करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे तर गुरुनाथ ऊर्फ गोट्या नाचणकर (रा. एमआयडीसी, नाचणकर चाळ, रत्नागिरी) आणि सुशील रहाटे (रा. कोळंबे, रत्नागिरी) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. सोमवारी दुपारी राजेंद्र विटकर आणि या दोन संशयितांमध्ये कोणत्या तरी कारणातून वाद झाला होता. याचा राग मनात धरून संशयितांनी सोमवारी रात्री राजेंद्रच्या हातांवर आणि पायांवर वार केले. यात राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. मंगळवारी राजेंद्रवर कोल्हापूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.
पायांवर वार केले. यात राजेंद्र गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. मंगळवारी राजेंद्रवर कोल्हापूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या बाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे करत आहेत.