सिंधुदुर्ग ; शांताराम राऊत : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते मे 2022 या पाच महिन्यांत जन्मलेल्या एकूण 2 हजार 465 नवजात बालकांमध्ये मुलांपेक्षा केवळ 3 मुली कमी जन्मल्या आहेत. मुलगे 1 हजार 234 तर मुली 1 हजार 231 एवढ्या जन्मल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या गतवर्षामध्ये 6 हजार 280 बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये 3 हजार 216 मुलगे तर 3 हजार 064 मुलींचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये मुलगे व मुलींच्या जन्माचे प्रमाण पाहता मुलांच्या जन्मापेक्षा 152 एवढ्या मूली कमी जन्मल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत एकूण 7255 एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला होता. तर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या वर्षात 6280 नवजात बलकांचा जन्म झाला आहे.

975 एवढी बालके कमी जन्मली आहेत. यावरून जिल्ह्याच्या जन्मदर घटल्याचे स्पस्ट होत आहे. सन 2020 मध्ये 3792 मुलगे व 3464 मुलींचा जन्म झाला होता.तर 2021 मध्ये 3216 मुलगे व 3064 मुली जन्मल्या आहेत. 2020 या वर्षीच्या तुलनेत 975 एवढी बालके कमी जन्मली असून मुलांपेक्षा केवळ 152 एवढयाच मूली कमी जन्मल्याचे दिसून येत आहे.

2020 च्या तुलनेत 2021 मध्ये मुलींच्या जन्मप्रमाणात वाढ झाली आहे. तर जानेवारी ते मे 2022 या पाच महिन्यात 1234 मुलगे व 1231 मुलीं अशा एकूण 2465 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलांपेक्षा केवळ 3 मूली कमी जन्मल्या असल्याचे व जन्म प्रमाणात समतोल आल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

मुलींच्या जन्मप्रमाणात वाढ

जिल्ह्यात मुलींच्या जन्माबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासन व जनतेकडूनही मुला-मुलींचे स्वागत होऊ लागले आहे. विविध उपाययोजना, शासकीय योजनेचा लाभ मुलींच्या जन्मानंतर दिले जात आहेत. तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या जन्मप्रमाणाशी बरोबरी करू शकले नव्हते. मात्र जानेवारी ते मे 2022 या पाच महिन्यामध्ये जन्मलेल्या एकूण 2 हजार 465 नवजात बालकामध्ये मूली आणि मुलगे यांच्या जन्म प्रमाणात समतोल दिसू लागला आहे. मुलापेक्षा केवळ 3 मुली कमी जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील मुलींचे जन्मप्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक राहिले आहे. तसेच मुलींचे जन्मप्रमाण वाढताना दिसत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here