बांदा : पुढारी वृत्तसेवा
राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी उशिरा वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा पटेलवाडी गावच्या हद्दीमध्ये एका काजू फॅक्टरीच्या समोरील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये अचानक छापा टाकून 20 लाख 21 हजार 760 रुपयांचा अवैध मद्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी संशयित लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (रा.गाडीअड्डा, वेंगुर्ले) याला फरार घोषित करण्यात आले.

या छाप्यामध्ये कागदी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्याच्या विविध ब्रॅन्डच्या 180 मिलीच्या 9,696 सिलबंद काचेच्या बाटल्या व 750 मिलीच्या 1008 सिलबंद प्लास्टीक बाटल्या असे एकूण 286 बॉक्स सापडले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूरचे विभागीय उपआयुक्त बी.एच.तडवी यांच्या आदेशाने निरीक्षक पी.आर.पाटील, निरीक्षक अ.अ. पाडळकर, दुय्यम निरीक्षक आर.जी. येवलुजे, दुय्यम निरीक्षक एस.एस.गोंदकर, दुय्यम निरीक्षक वायदंडे, सहायक दुय्यम निरीक्षक आर.डी.ठाकूर व कॉन्स्टेबल श्री.बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे, एच.आर.वस्त यांनी केली.

जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग सुशेगात!

परजिल्ह्यातील भरारी पथक येऊन त्यांच्या गुप्त माहितीनुसार माहिती मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारवाई पार पाडतात. मात्र, स्थानिक विभागाला ही कारवाई करता आली नाही.यामुळे जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग सुशेगात असल्याची चर्चा आता नागरिक करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here