
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी क्रांतिनगर येथे राजेंद्र शिवाजी वीटकर (28, रा. क्रांतिनगर, रत्नागिरी) या तरुणावर धारदार तलवारीने वार करणार्या दोन संशयितांना तसेच त्यांना पळून जाण्यास आणि आपल्या घरी आश्रय देणार्याला अशा एकूण तिघांना शहर पोलिसांनी अटक केली.
या तिघांचीही न्यायालयाने 17 जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. गुरुनाथ प्रताप नाचणकर (26,रा. मिरजोळे, रत्नागिरी), सुशील सुनील रहाटे (33, रा.लक्ष्मी नगर कोळंबे, रत्नागिरी) आणि सौरभ अर्जुन सावंत (32, रा.सुपलवाडी नाचणे, रत्नागिरी) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत राजेंद्रचा भाऊ रवींद्र विटकर याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार 6 जून रोजी दुपारी राजेंद्रचा गुरुनाथ नाचणकर आणि सुशील रहाटेशी वाद झाला होता. या रागातून रात्री 8.20 वा. या दोघांना राजेंद्रवर धारदार तलवरीने वार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. वार केल्यानंतर दोन्ही संशयित फरार झाले होते.
या प्रकरणी शहर पोलिस त्यांचा शोध घेत असताना सौरभ सावंत हा संशयितांशी संपर्कात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सौरभच्या घरी जाउन त्याची चौकशी केली असता संशयित गुन्हा घडल्यापासून आपल्या संपर्कात असल्याचे आणि दिवसा आपल्याा घरी आश्रय घेऊन असल्याचे त्याने कबूल केले. संशयित सोमवार 13 जून रोजी रात्री माळनाका परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून रात्री 12 वा. सुामरास त्यांना अटक केली.त्यांची चौकशी केल्यावर दोघांनीही गुन्हा कल्याचे कबूल केले. मंगळवारी या तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.