अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : अलिबाग पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ही आग चार ते पावणे पाच वाजताच्या दरम्यान लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने आगीने भीषण रुप धारण केल्याचे दिसत आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दल दाखल झाले.

आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत नाट्यगृहातील साउंड सिस्टिम, छत आणि खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. नाट्यगृहाच्या भिंतीचे छत कोसळून खाली पडले आहे. सुदैवाने आज नाट्यगृहात कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे जीविततहानी टळली.

मागील दोन दिवसापासून नाट्यगृहात वेल्डींगचे काम सुरू असल्याची प्रथमिक माहिती मिळाली. या दरम्यान, वेल्डींग वर्कची एक ठिणगी पडद्यावर पडल्याने ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर पालिकेचे अग्निशमन दल प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. मात्र ही ज्वाला अधिक उद्रेक झाला होती. काही काळानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here