वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा ; विनापरवाना सिलिका वाळू वाहतूक करणार्‍या पाच डंपरवर महसूलच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. गुरुवारी पहाटे 4 वाजता करूळ पोलिस चेक नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. हे डंपर पथकाने तहसील कार्यालयात आणून लावत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली .

मंडळ अधिकारी अजित कदम, तलाठी बागल, चरापले व कांबळे यांचे भरारी पथक करूळ चेक नाक्यावर तपासणीसाठी तैनात करण्यात आले होते. गुरुवारी पहाटे सिलिका वाळूने भरलेले डंपर तरेळेहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना या भरारी पथकाने चेक नाक्यावर थांबवले. त्यांच्याकडे सिलिका वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. भरारी पथकाने त्या पाचही डंपरवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे विनापरवाना वाळू वाहतूक करणार्‍यांना चांगलाच चाप बसणार आहे. दरम्यान, याबाबत वैभववाडी नायब तहसीलदारांकडे चौकशी केली असता, त्यांनी केवळ एकच डंपर ताब्यात घेतला असून, दंडाची कारवाई सुरू असल्याचे सांगितले. मात्र, तहसील कार्यालयातील एका कर्मचार्‍याने ओव्हरलोड वाळू वाहतूकप्रकरणी पाच डंपर ताब्यात घेतल्याचे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले.या विसंगत माहितीमुळे या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here