कणकवली : पुढारी वृत्तसेवा
कणकवली येथील शिवाजी मेमोरियल हायस्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा रमण बाणे हिने दहावी परीक्षेत 99.20 टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्हयात व कणकवली तालुक्यात व्दितीय येण्याचा बहुमान मिळविला आहे. स्वरा लहानपणापासूनच अतिशय हुशार व अभ्यासू असून याआधी तिने चौथी व सातवीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा यश संपादन केले आहे.

कसाल प्रशालेचे निवृत्त शिक्षक श्री. रघुनाथ बाणे सर व कासार्डे प्रशालेच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती सुशीला सावंत यांची ती नात होय. स्वराचे वडील प्रा. डॉ. रमण बाणे व आई सौ. मेघा बाणे यांचे तिच्या यशामध्ये विशेष योगदान आहे. एस. एम. ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षकांचे तिने याप्रसंगी आभार मानले. या यशाबद्दल स्वराचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here