कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : गेली वीस वर्षे अनेक प्रकारची विघ्ने पार करीत सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळाच्या (चिपी) (Sindhudurg Airport) धावपट्टीवर कोल्ह्याचा उपद्रव सुरू झाला. त्या कोल्ह्यापासून सुटका मिळण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने वनविभागाशी संपर्क साधून पिंजर्‍याचा उपाय केला. पण त्यात अपेक्षित यश येताना दिसत नाही, म्हणून आता विमान लॅन्डिंग होण्याच्या वेळी चक्क वाघाच्या डरकाळीचा आवाज ध्वनीप्रक्षेपकाद्वारे सुरू केला आहे. जेणेकरून वाघाच्या डरकाळीच्या आवाजाने कोल्हे धावपट्टीवर येण्यापासून थांबतील. पण खरंच, वाघाच्या डरकाळीचा आवाज त्या कोल्ह्यांना रोखू शकेल का? हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg Airport) जिल्ह्यात चिपीच्या माळरानावर गेली कित्येक वर्ष अनंत अडथळ्यांची शर्यतीत अडकलेल्या विमानतळ प्रकल्पाचा प्रश्न गतवर्षी दि. ९ ऑक्टोबरला मार्गी लागला. तो सुवर्णक्षण तमाम जिल्हावासियांनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. त्यानंतर चिपी विमानतळावर नियमित प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू झाली. दुसरीकडे काही दिवसातच चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्ह्याचा वावर दिसू लागला. या कोल्ह्यांची विमान लॅन्डिंग करणार्‍या पायलटला मोठी अडचण निर्माण झाली. त्यानंतर वनविभागाचे याकडे लक्ष वेधताच वनविभागाने आपले पिंजरे तेथील आवारात (गेटच्या बाजुला ) लावले, पण त्या पिंजर्‍याचा काहीच उपयोग झाला नाही.

त्यानंतर मोठ्या विचारमंथनानंतर कोल्हा कुणाच्या आवाजाला घाबरतो, तर वाघाच्या डरकाळीला ? हे समजल्यावर चिपी विमानतळावर ध्वनिप्रक्षेपकाच्या माध्यमातून विमान लॅन्डिंग होण्याच्या काही वेळ आधी वाघाच्या डरकाळीचा आवाज सुरू केला जातो, त्या आवाजाला कोल्हे घाबरून जातात का? हे पाहणे औसुक्याचे आहे. पण काहीही असो आधी कोल्ह्यांचा विमानतळाच्या धावपट्टीवर वावर, त्यानंतर बिबट्याची संरक्षक भितींवरून उडी याची जोरदार चर्चा झाली. तशीच बहुधा त्यापेक्षा अधिक चर्चा धावपट्टीवर येण्यार्‍या कोल्ह्यांना रोखण्याकरीता ध्वनीप्रक्षेपकाद्वारे लावलेल्या वाघाच्या डरकाळीची सुरू झाली आहे.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here