चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात आज (दि.१८) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एका ट्रकला अचानक आग लागली. या आगीत ट्रकच्या इंजिनाचा भाग जळाला. सुदैवाने चालक व क्लिनरने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर पडले.

ट्रकला आग लागल्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. तत्काळ लोटे एमआयडीसी आणि चिपळूण नगरपरिषदेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवली. त्यामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारा ट्रक काही अंशी वाचला. यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. परंतु सुमारे दीड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here