
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : फ्लॅट आणि नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेची सुमारे साडे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शनिवारी संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश अशोक मुरकर (रा.मागलाड फणसोप, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात 36 वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 30 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत अमोल याने तक्रारदार महिलेचा विश्वास संपादन केला. फ्लॅट आणि काम मिळवून देतो असे सांगत त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये उकळले. परंतु पैसे देऊनही फ्लॅट आणि नोकरी यातील काहीच मिळाले नाही. त्यामुळे तक्रारदार महिलेने अमोलला याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबधित महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहाय्यक पोलीस फौजदार अशोक राठोड याबाबत अधिक तपास करत आहेत.
‘मिर्झापूर’च्या मुन्ना भैय्याची रंजक लव्हस्टोरी, अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी सुंदर पत्नी.. https://t.co/ZXUufkh7AN#entertainment #mirzapur #pudharionline
— Pudhari (@pudharionline) June 18, 2022
हेही वाचा