रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सौदी येथे काम करताना सहकार्‍याच्या सांगण्यावरून तेथील कंपनीने कामावरून काढल्याच्या रागातून चाकूने सपासप वार केल्याच्या आरोपातून कोतवडे येथील तरुणाची आणि त्याच्या साथीदाराची न्यायालयाने सबळ पुराव्याभावी शनिवारी निर्दोष मुक्तता केली.

सन्मित्र नगर येथील ओसवाल नगर येथे राहणारा तौसिफ मोहम्मद शरीफ गुहागरकर (30) हा कामानिमित्त सौदी येथे असताना त्याच्यासोबत अकीफ पटेल (रा. कोतवडे) हा देखील त्याच्यासोबत सौदी येथे कामाला होता. हे दोघेही एकाच रुममध्ये राहत होते. तौसिफ याचा पेन ड्राईव्ह ऑफिसमधील कामाच्या इतर वस्तू लपवून ठेवणे असे प्रकार अकीफ हा करत होता. यावरून त्या दोघांच्यात वाद व्हायचे. यातून तौसिफ रुम सोडून दुसरीकडे राहण्यास गेला होता. तेव्हापासून आकीफ हा तौसिफवर मनात राग धरून होता. त्याने तौसिफ याला, तुला बघून घेईन, अशी धमकीही दिलेली होती. तौसिफ सौदीतून रत्नागिरीत सुट्टीवर आलेला असताना 20 सप्टेंबर 2019 रोजी तो नमाज पठण करण्यासाठी घराबाहेर पडला असता ही घटना घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here