कणकवली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून (दि.२०) सिंधुदुर्गात दमदार पावसाला (Mosoon in Kokan) सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्य्यात आहेत.

यावर्षी मान्सूनची (Mosoon in Kokan)  सुरुवात काहीशी रखडत झाली. मान्सून म्हणावा तेवढा जोरदारपणे बरसला नव्हता. गेले काही दिवस मध्येच एखादी सर कोसळली तर कोसळली, नाहीतर कडक ऊन पडत होते. सकाळच्या सत्रात धुकेही पडत होते. त्यामुळे बळीराजासह सर्वांनाच दमदार पावसाची प्रतीक्षा होती. अखेर आजपासून सिंधुदुर्गात दमदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे, काही प्रमाणात ढगांचाही गडगडाट झाला. अर्थात या पावसात सातत्य असेल की नाही, हे पहावे लागेल. अजून जिल्ह्यात नद्यांच्या साखळ्या तुटलेल्या नाहीत. मात्र, पावसास सुरुवात झाली, ही समाधानाची बाब आहे.

हेही वाचलंत का ? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here