पेडणे : पुढारी वार्ताहर
ओशेलबाग धारगळ येथे उभा करून ठेवलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धक्का दिल्यामुळे कारमधील तिघे जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी पहाटे 5 वा. झाला.

कार कलंगुट बागाहून ओरोस कुडाळ येथे जात होती. या गाडीमध्ये एकूण पाच जण होते. गाडीचा ताबा गेल्यामुळे ट्रकला पाठीमागे जोरदार धक्का दिला. ही घटना पेडणे अग्निशामक  दलाला कळताच अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी आणि जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये दोघे अडकून पडले होते. त्यात चालक हिमांशू ही व्यक्ती ड्रायव्हर सीटवर स्टेअरिंगमध्ये अडकली होती. जवानांनी स्टेअरिंग व सीटचा भाग अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून हिमांशूला बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी सीटच्या पाठीमागे बसलेल्या विक्रमला बाहेर काढून आझीलो हॉस्पिटल म्हापसा येथे पाठवण्यात आले. नंतर हिमांशू याला जखमी अवस्थेत आझीलो हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here