बांदा : पुढारी वृत्तसेवा
सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने येथील खेमराज मेमोरियल प्रशालेच्या आवारातील पिण्याच्या पाण्याची दगडी बांधकाम केलेली विहीर सायंकाळी अचानक कोसळली. सुदैवाने परिसरात कोणीही नसल्याने दुर्घटना टळली. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण पावसकर यांनी दिली.

खेमराज प्रशालेच्या मुख्याध्यापक दालनासमोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. सोमवारी दुपारी बांदा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने मुख्याध्यापक पावसकर यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी विहीर कोसळल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने सायंकाळची घटना असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते. बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पंचनामा करून नुकसानीची नोंद केली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here