
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
पावसाळी बंदीकाळातील मासेमारी रोखण्यासाठी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त विभागाचे पथक मासळी उतरवण्याच्या केंद्रांवरच्या जेटींवर गस्त घालत आहे. यामध्ये कासारवेली येथे दोन नौका नुकत्याच पकडण्यात आल्या. गेल्या वर्षी पावसाळी बंदीकाळात मासेमारी करण्यास समुद्रात गेलेल्या दहा नौकांवर कारवाई झाली आहे.
पावसाळी मासेमारी बंदी 1 जूनपासून सुरू झाली. पावसाळ्यात मासेमारी करणे धोकादायक असते. त्याचबरोबर माशांचा प्रजनन काळही असतो. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणार्यांवर कारवाई केली जाते. नुकतीच कासारवेली समुद्रात मासेमारी करून परतलेल्या दोन नौका पकडून कारवाई करण्यात आली.
या नौका कासारवेली जेटीवर अटकावून ठेवण्यात आल्या असून नौकेवर मिळालेली मासळीचा लिलाव करून आलेली रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा खटला सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर चालणार आहे.