
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा; भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाच्या परीक्षेसाठी येऊन बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन्नी पालराम (वय २८, रा. अलिपूर जिंद हरियाणा), सोनू शिशुपाल (२२, रा. भुंडगा कॅथल, हरियाणा), सन्नी सुभाष भोसला (२३, रा. जिंद हरियाणा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तटरक्षक दलाचे प्रधान नाविक विमल रामकुमार जंगीड (सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
बुधवार २२ जून रोजी सकाळी ८.३० वाजता भारतीय तटरक्षक दल वायू अवस्थानच्या फायरमन पदाची परीक्षा घेण्यात येत होती. त्यावेळी कार्यालयाच्या मेनगेटवर या तिघांची तपासणी केल्यावर त्यांच्याजवळ इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ब्लूटूथ, बनावट कागदपत्रे होती. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहेत.