शिवसेना

वेंगुर्ले ; पुढारी वृत्तसेवा : कोणीही, कुठेही गेले तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा एकमुखी निर्णय गुरुवारी वेंगुर्ले तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तालुकाप्रमुख यशवंत ऊर्फ बाळू परब यांच्याप्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

यशवंत परब म्हणाले,20 जून रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटेपासून शिवसेनेला हेलावणारी घटना समोर आली. एकनाथ शिंदे व अन्य आमदारांचा गट गुजरातमध्ये गेल्याची बातमी झळकली.सुमारे 40-45 आमदार शिंदे यांच्यासोबत असल्याची बातमी प्रसारमाध्यमांवर येत असताना या मतदारसंघाचे आ. दीपक केसरकर हे ही त्या गटात सामील झाल्याची बातमी गुरुवारी सोशल मीडिया, माध्यमांवर येत आहे. परंतु कोणी – कुठेही गेले तरी आम्ही वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कुणाचेही समर्थक न राहता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत, असा एकमुखी निर्णय झाला आहे.

तसेच महिलांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी यांच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर उद्धव साहेब,आदित्य ठाकरे आगे बढो – हम तुम्हारे साथ है,शिवसेनेचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, आवाज कुणाचा, शिवसेनेचा…अशा घोषणा देण्यात आल्या.

शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, सचिन देसाई, उपतालुकप्रमुख उमेश नाईक, युवासेना चे पंकज शिरसाट, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, संदीप केळजी, दयानंद खर्डे, संजय गावडे, आनंद दाभोलकर, शैलेश परुळेकर, अण्णा वराडकर, गजानन गोलतकर,वेदांग पेडणेकर, सुयोग चेंदवणकर, राणे, कौशल मुळीक,बटा आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

The post कोणीही, कुठेही जावो, आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीशी appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here