
ओरोस , पुढारी वृत्तसेवा : ओरोस-ब्राह्मणवाडी येथे उभ्या टेम्पोला अचानक आग लागल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री 2 च्या सुमारास हा प्रकार घडला. टेम्पोला लागलेली आग घरातील विद्युत वायरपर्यंत पोहोचल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. पण, नागरिकांनी मिळेल तिथले पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ओरोस-ब्राह्मणवाडी येथे महिंद्र परब यांच्या घराला लागून टेम्पो उभा होता. हा टेम्पो सीएनजी होता. रात्री 2 च्या सुमारास या टेम्पोने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच महिंद्र परब यांच्या आईने खिडकी उघडून बाहेर पाहिले असता त्यांना टेम्पोला आग लागल्याचे निदर्शनास आले.
या आगीने घराच्या विद्युतवाहिन्यासुद्धा पेटू लागल्या होत्या. हा प्रकार पाहताच महिंद्र यांच्या आईने आरडा ओरड केली. त्यानंतर अग्नीशमक बंब कार्यालयात फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही.