कणकवली; नितीन सावंत : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी गुवाहाटीमध्ये जावून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांचे स्वागत केले.

शिवसेनेत सुरु असलेल्या बंडखोरीमध्ये सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही उडी घेतली आहे. गुवाहाटीमध्ये जावून रविवारी त्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सायंकाळी कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद व्यक्त केला. कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन मुक्त चौक व शिवसेना शाखेसमोर नरडवे नाका येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाके फोडण्यात आले. शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशीर परुळेकर, सोशल मिडीया जिल्हाप्रमुख समीर प्रभुगावकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या गोटात शांतता होती. मात्र भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केल्याने तो चर्चेचा विषय बनला होता. पालकमंत्री हे भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे गटात सामील झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांकडून हे फटाके फोडण्यात आले.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here