रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील विजय सॉ-मिलच्या कटरमध्ये सापडून झालेल्या भीषण दुर्घटनेत सॉ-मिल मालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (26 जून) सकाळी 10.30 वा. सुमारास घडली असून जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश शामजी पटेल (वय 49, रा.वाटद खंडाळा, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या सॉ-मिल मालकाचे नाव आहे. याबाबत सॉ-मिलमधील कामगार वैभव यशवंत साहिलकर याने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी रमेश पटेल आपल्या विजय सॉ-मिलमध्ये गेले असताना मशिन नीट चालत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यासाठी ते मशिनची गती कमी करण्यासाठी जात असताना त्यांचा पाय घसरला आणि ते थेट मशिनच्या कटरमध्ये पडले. यात पटेल यांचा उजवा हात आणि छाती सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच जयगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल किशोर धातकर करत आहेत.

हेही वाचा









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here