क्राईम

आचरा , पुढारी वृत्तसेवा :  आचरा -देऊळवाडी येथील सौ. राखी प्रसाद घाडी (33) या विवाहित महिलेने घराच्या मागील पडवीत  नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार सकाळी 8.30 वा. च्या  दरम्यान घडली. या घटनेची खबर आचरा पोलिसांना तिचे पती प्रसाद घाडी यांनी दिली.

आपण सकाळी कामावर गेल्यानंतर पत्नी  मुलासमवेत घरी होती.  दरम्यान, वाडीतील शेजार्‍यांनी माझ्या घराचा दरवाजा बंद असून मुलगा बाहेर रडत असल्याचे कळविले. मी कामावरून घरी आलो असता घराला आतून कडी लावलेली होती. म्हणून पडावीत मागच्या बाजूने छपरावर चढून घरात प्रवेश केला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याचे त्यांनी फिर्यादीत सांगितले.

आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील व पोलिस कॉन्स्टेबल एस. एस. कांबळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सौ.  राखी यांच्या पश्‍चात  पती, मुलगा, सासू असा परिवार आहे.

The post कोकण : आचरा देऊळवाडी येथे विवाहितेची आत्महत्या appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here