
ओरोस , पुढारी वृत्तसेवा : नात्यातीलच एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी धरून तिघा आरोपींना विशेष जिल्हा न्यायाधीशांनी त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 13 ऑगस्ट 2017 रोजी हा गुन्हा देवगड पोलिसांत दाखल झाला होता. पीडित मुलगी गरोदर राहील्याने ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अवधूत ऊर्फ जयू शांताराम राणे व अजय विजय राणे या दोन आरोपींना वीस वर्षे सश्रम कारावास व दंडाची तर केशव महादेव राणे या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास व दंड, अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता अॅड. रूपेश देसाई यांनी काम पाहिले.
अवधूत राणे याला भादंवि कलम 376 (2) बारा वर्षे सश्रम कारावास एक हजार रुपये दंड. कलम 376 ड खाली वीस वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड. कलम 506 खाली एक वर्ष सश्रम कारावास व पाच शे रुपये दंड किंवा पाच दिवस साधी कैद व पोस्को 14 नुसार तीन वर्षे सश्रम कारावास सहाशे रुपये दंड किंवा सहा दिवस साधी कैद पॉस्को 12 नुसार एक वर्ष सश्रम कारावास सहाशे रुपये दंड किंवा सात दिवस साधी कैद. ही शिक्षा एकत्रपणे भोगावयाची आहे.
अजय राणे याला 376 ड नुसार वीस वर्षे सश्रम कारावास व एक हजार दंड. 354 ए 1 नुसार एक वर्ष सश्रम कारावास पाचशे रुपये दंड. कलम 506 त्यानुसार एक वर्ष सश्रम कारावास पाचशे रुपये दंड. पोस्को 12 नुसार एक वर्ष सश्रम कारावास सहाशे रुपये दंड अशी शिक्षा या आरोपीने एकत्रित भोगावयाची आहे. तिसरा आरोपी केशव राणे याला 376 खालील दोषी धरून सात वर्षे सश्रम कारावास एक हजार रुपये दंड.506 नुसार एक वर्षे सश्रम कारावास पाचशे रुपये दंड. पोस्को 8 अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंड. पोस्को 12 नुसार एक वर्ष सश्रम कारावास सहाशे रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद असे शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सुनावणीत तपासी पोलिस अधिकारी, पीडित मुलगी, तिचे वडील तसेच वैद्यकीय अधिकारी अशा आठ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या.