
खेड, पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यात पावसाची सोमवारी दि. 27 रोजी देखील संततधार सुरू असून सायंकाळी 4 वाजता जगबुडी नदीने पाच मिटर ही इशारा पातळी ओलांडली आहे. पालिकेने शहरातील नदी किनार्यावरील पूर प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी दि. 27 रोजी तालुक्यातील जगबुडी व नारिंगी नद्यांचा जलस्तर सतत वाढत आहे.
गेल्या चोवीस तासांत तालुक्यात एकूण 29 मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर दि. 27 जून सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 188 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात पावसाची 1155 मिलीमीटर नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी पाऊस कमी पडला असला तरी गेल्या 24 तासापासून संततधार सुरू असल्याने हवेत गारवा पसरला आहे.
नागरिकांनी सतर्क तेचे आवाहन
खेड शहरानजीकच्या जगबुडी व नारिंगी नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याने आम्ही सर्व नागरिक व व्यापारी बांधवांना सोशल मीडियाद्वारे कळवून सावधानतेचा व सुरक्षितेचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात नदीकिनार्याजवळ रहात असलेले नागरीकांनी व शहरातील नागरिक तसेच व्यापारी बंधूंनी सतर्क राहिल्यास नुकसान टाळता येईल, असे आवाहन खेड नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी केले आहे.
The post कोकण : जगबुडीने ओलांडली जूनमध्येच इशारा पातळी appeared first on पुढारी.