
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा: शहरातील झाडगाव येथील लघु उद्योग परिसरात सोमवारी (दि.२७) सायंकाळी शहर पोलिसांनी जुगार अड्डावर छापा टाकला. रोख रक्कम, दोन कार, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रीतम घोसाळे (वय ४२, रा. आंबेशेत, रत्नागिरी ), राजेश कोळेकर (वय ४३, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी ), प्रशांत महाजन (वय ४९, रा. कुवारबाव, रत्नागिरी ), अमोल शेट्ये ( वय २६, रा.नाचणे, रत्नागिरी ), दयानंद गुरव (वय २८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी ), देवानंद सुर्वे (रा. झाडगाव, रत्नागिरी ) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार विनोद भितळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.संशयित आरोपीनी झाडगाव लघु उद्योग परिसरात गैरकायदा जुगार अड्डा चालवल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?