कणकवली : पुढारी वृत्‍तसेवा कणकवली नगरपंचायतच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वार्षिक लेख्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या संदर्भावरून राजकीय टोलेबाजी रंगली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत शिवसेनेच्या सुमेधा अंधारी या वगळता अन्य नगरसेवकांनी पाठ फिरवली. तो मुद्दा पकडत नगराध्यक्षांनी कोपरखळी मारताना बाकीचे शिवसेनेचे नगरसेवक बहुदा गुवाहाटीला गेले असावेत असा टोला लगावला.

कणकवली नगरपंचायतच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वार्षिक लेख्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक, अ‍ॅड. विराज भोसले, अभिजीत मुसळे, मेघा सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, उर्वी जाधव, शिशिर परुळेकर, शिवसेनेच्या नगरसेविका सुमेधा अंधारी आदी उपस्थित होते.

सध्या राज्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्याचे पडसाद आजच्या बैठकीत दिसून आले. शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेविका वगळता अन्य नगरसेवक अनुपस्थित होते. यावरुन नगराध्यक्ष समीर नलावडे व सत्‍ताधार्‍यांनी टोलेबाजी केली. शिवसेना नगरसेविका सुमेधा अंधारी यांच्या एकमेव उपस्थितीबाबत नगराध्यक्षांनी त्या आमच्या नातेवाईक आहेत असं सांगत भविष्यातील राजकीय नांदीचे संकेत तर दिले नाहीत ना? अशीही चर्चा होती.

शिवसेनेच्या एकमेव नगरसेविका हजर

 

हेही वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here