महाड; पुढारी वृत्तसेवा: महाड – भोर मार्गावरील वाघजाई मंदिर येथील एका स्टॉलवर बुधवारी दुपारी डोंगरावरील दरड कोसळली. या घटनेत स्टॉल मालक अरुण गणपत पवार (वय ५०, रा. वरंध) हे गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा महाड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची चाहुल लागल्याचे बोलले जात आहे.

या घटनेची माहिती अशी की, गेली तीन -चार दिवस तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. याच दरम्यान बुधवारी (दि.२९) रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास वाघजाई मंदिर येथील एका स्टॉलवर अचानक दरड कोसळली. या घटनेत स्टॉल मालक अरुण गणपत पवार हे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच महाड येथील साळुंखे रेस्क्युटिमचे अध्यक्ष प्रशांत सांळुखे हे आपल्या टिम सदस्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर जखमी अरुण पवार यांना तात्काळ महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर अरुण पवार यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या प्रकरणाची माहिती समजताच महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व एमआयडीसी पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचलंत का? 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here