चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : अमरावती मध्यवर्ती कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पळून गेले आहेत. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारा चिपळूण तालुक्यातील नायशी येथील अट्टल गुन्हेगार साहील काळसेकर याचाही समावेश आहे. तो अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना भिंतीवरून उडी टाकून पळाला आहे. गुन्हेगार चिपळूण येथे आपल्या मूळगावी येण्याची शक्यता असल्याने पोलिस सतर्क झाले आहेत.

तीन कैद्यांनी कारागृह पोलिसांना गुंगारा दिला आहे. पसार झालेल्या कैद्यांमध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाटमधील दोन कैदी तर जन्मठेपीची शिक्षा भोगणारा रत्नागिरी जिल्ह्यातील साहील काळसेकर हा एक कैदी आहे. याआधी तीन वेळा साहील काळसेकर पोलिसांच्या तावडीतून पळाला होता. एकूण 28 गंभीर गुन्हे साहील काळसेकरवर दाखल असून त्यामध्ये खून, दरोडे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत.

अनेक लोकांवर हल्ला केल्याचे गुन्हे त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. सकाळी तीन कैदी पळून गेल्याची माहिती कारागृह पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पसार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. रोशन गंगाराम उईके, सुमित शिवराम धुर्वे तर जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला साहिल काळसेकर असे पसार झालेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

सर्व कैदी झोपेत असताना या तिघांनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. शिवाय कारागृह पोलिसांनाही काही कळलं नाही. मध्यरात्री सर्व झोपलेले असताना हे सुरक्षा भिंतीजवळ आले. तिथून त्यांनी सुरक्षा भिंत ओलांडली. त्यानंतर पळून गेले. एवढी मोठी सुरक्षा भिंत असताना ती त्यांनी कशी ओलांडली असेल, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here