रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : माझ्या मतदारसंघात अतिउत्साही नेते आहेत. माझ्यानंतर आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा समज करून त्याच थाटात वावरत आहे, अशा शब्दात ना. उदय सामंतयांनी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांवर थेट टीका केली आहे. त्यामुळे या टिकेला शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते काय उत्तर देतात याकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

गुवाहाटी येथून ना. सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपली भूमिका ही स्वत:ची भूमिका आहे. शिंदे गटाची भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला नसल्याचेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. आमचे बंड आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. तो कोण पसरवतय हे आम्हाला माहित आहे. मात्र, आमचे बंड नसून ही मोहीम आहे. ज्यांना या मोहिमेमुळे धक्‍का बसणार आहे. अशाच लोकांकडून या मोहिमेला बदनाम केले जात असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले. मला पक्षातून काढून टाकले आहे, अशा थाटात जिल्ह्यासह मतदारसंघातील काही नेते वावरत आहेत. त्यांनी आता पक्षाचा मेळावा ठेवला आहे. त्या मेळाव्यात माझ्यावर टीका होईल, मला गद्दार ठरवले जाईल. हे सर्व होत राहिले तरी मी शिवसेनेतच आहे, असा दावाही ना. सामंत यांनी केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही निष्ठावान शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही बंड केले असे संबोधल जात असले तरी हे बंड नसून राष्ट्रवादी, काँग्रेसच्या विळख्यातून शिवसेनेला वाचविण्यासाठी सुरू केलेली मोहीम आहे. अनेक वर्षे आपण युती म्हणून काम केले आहे. त्यावेळी अशा कुरघोडी मित्र पक्षाकडून होत नव्हत्या असेही ना. सामंत यांनी सांगितले. आता आमचे हॉटेलचे बील कोण भरतयं याच्यावर चर्चा सुरू आहे. आमची भूमिका योग्य आहे. ती हॉटेलच्या मालकांना पटल्यामुळे त्यांनी आम्हाला मोफत राहायला दिल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here