खेड:पुढारी वृत्तसेवा; खेड शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. तालुक्यात आतापर्यंत 355 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगर परषदेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील नातूनगरसह सर्वच धरणात वेगाने पाण्याची पातळी वाढत आहे.

खेड तालुक्यातील जगबुडी व नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत सोमवारी दि. 4 रोजी सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. या पावसाचा जोर कायम राहिल्यास ग्रामीण भागात जाणारे मार्ग बंद
होण्याची दाट शक्यता आहे. पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानुसार सोमवारी सकाळपासूनच खेडमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसासोबत सोसाट्याचा वारा वाहत असून ग्रामीण भागात मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.

प्रशासनाने नदीकिनार्‍यावरील नागरिकांना सावधानता व सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतीची लावणीची कामे सुरू असली तरी नदीच्या किनार्‍यावरील शेतजमिनीमध्ये शेतकर्‍यांनी शक्यतो दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह ग्रामीण भागातील लहान मोठ्या नद्या, ओढे – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने तालुक्यातील जगबुडी व नारंगी या दोन प्रमुख नद्यांनी रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे.

सांयकाळी पाच वाजता जगबुडी नदीने 6.40 मिटरची पातळी गाठली होती. त्या नंतर जलस्तर वेगाने वाढला असुन, सध्या जगबुडी नदी 7 मीटर धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारासजगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी मटण-मच्छिमार्केट येथून पाणी खेड बाजारपेठेत घुसू लागले नदी किनार्‍यावर मासे मारी करणार्यासाठी कोणीही जाऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. पावसामुळे महाम मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील धीम्या गतीने सुरू आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here