दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग तालुक्यात सतत मुसळधार पाऊस सुरुच असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. आज मंगळवारी (दि. ५) रोजी पिकुळे ( शेळपीवाडी ) येथील हनुमान मंदिरशेजारील जुने वडाचे भले मोठे झाड उन्मळून पडले. यात हनुमान मंदिराच्या सभा मंडपाचे आणि शेजारी उभ्या करण्यात आलेल्या आलिशान गाडी (कार)चे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेची माहिती मिळताच तलाठी लहाने, सरपंच दिक्षा महालकर, पोलिस पाटील दिगंबर गवस, ग्रा .पं. सदस्य नीता गवस यांनी घटनास्‍थळी भेट देत पाहणी केली आहे.

हेही वाचलंत का? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here