सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा:  तालुक्यात सलग दुसऱ्यादिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सोमवारनंतर मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम होता. यामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत पाऊस पडत असल्याने येथील ग्रामीण भाग प्रभावित झाला आहे. या सततच्या पावसामुळे अद्यापतरी कोणत्याही प्रकारची पडझड किंवा दुर्घटना घडली नसल्याचे, नैसर्गिक आपत्ती कक्षातून सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुसळधार पावसात ओटवणे कापइवाडी रस्त्यावर झाड कोसळल्याने मुख्य रस्ता बराच वेळ बंद झाला होता. यामुळे दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक ठप्प झाली असून, दुचाकी वाहक त्यातूनही आपली वाहने बाहेर काढत आहेत. हे झाड विद्युत वाहिनीवर कोसळल्याने धोकादायक स्थिती उद्भवली होती. बराचकाळ त्याच स्थितीत हे झाड पडून असल्याने या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून, काही वेळांनी हे झाड कटरच्या साहाय्याने ग्रामस्थांकडून तोडण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. दरम्यान तालुक्यात अद्याप कुठेही नैसर्गिक आपत्तीची घटना घडली नाही.

हेही वाचा:

 









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here