
चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात आज मंगळवारी दुपारी दरड कोसळली. यामुळे चिपळूण- कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
परशुराम घाटामध्ये दरड कोसळत असताना हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग सुद्धा बंद झाला आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळली. तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जेसीबी पाठविला असून माती आणि खडक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
यानंतर घाटात खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कोकणातील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तर घाट रस्त्यामध्ये दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
हेही वाचलंत का?